लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ गेल्या दहा वर्षांपासून शाळांना शैक्षणिक नियोजन आणि मूल्यमापनासाठी मार्गदर्शन करत आहे. आमच्या शैक्षणिक उपक्रमांचा भाग व्हा.

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल
सामाजिक उपक्रम
सामाजिक उपक्रम

आमच्या शैक्षणिक संस्थेचा उद्देश

आमचा शैक्षणिक संस्थेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे — शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षण देणे. आमच्या संस्थेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध व्यवहार आणि सामुदायिक सहभाग यावर भर दिला जातो.

आमचे ध्येय

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व नैतिक शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कृत, जबाबदार व जागरूक नागरिक बनवणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.

आमच्या प्रमुख जबाबदाऱ्या

  • शाळेचे नियमित आणि योग्य नियोजन व व्यवस्थापन करणे.
  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नियमित परीक्षा व मूल्यमापन आयोजित करणे.
  • शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन व आवश्यक सूचना देणे.
  • गुणवत्तावाढीसाठी विशेष उपक्रम राबवणे.
  • विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा आणि बक्षीस वितरणाचे आयोजन करणे.
  • राष्ट्रीय सण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तिपर उपक्रम साजरे करणे.
  • शाळेच्या परिसरात स्वच्छता व स्वच्छतेसाठी विशेष लक्ष देणे.
  • पर्यावरण जागरूकता, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम यासारखे सामाजिक उपक्रम राबवणे.
  • शाळेतील इतर सर्व शैक्षणिक, सहशैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचे योग्य समन्वय साधणे.

0

नोंदणीकृत शाळा

विशेष उपक्रम व कार्यपद्धती

आमच्या संस्थेत शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षण, कौशल्यविकास, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक भान जागवणारे कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात.

शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम

  • इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत विविध शाखांचे शिक्षण: विज्ञान, वाणिज्य, कला, कृषी, तंत्रनिकेतन इत्यादी.
  • एम.सी.व्ही.सी., आय.टी.आय., डिप्लोमा कोर्सेससाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
  • शाळेतून बाहेरील अभ्यासक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीसाठी प्रोत्साहन.

विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी उपक्रम

  • वक्तृत्व, निबंध, चित्रकला, विज्ञान प्रदर्शन, नाट्य स्पर्धा यांचे आयोजन.
  • राष्ट्रीय सेवा योजना (NSS), स्काऊट-गाईड, मुलगी शिकली प्रगती झाली अशा उपक्रमांचा भाग.
  • जलसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता मोहिमा.

महिला सक्षमीकरण व प्रशिक्षण

  • महिलांसाठी शिवणकला, पाककला, सौंदर्य प्रशिक्षण, संगणक शिक्षण.
  • महिला बचतगट तयार करून स्वावलंबनासाठी प्रोत्साहन.
  • महिलांसाठी शासकीय योजना आणि रोजगार मार्गदर्शन शिबिरे.

समाजोपयोगी उपक्रम

  • बालसंगोपन केंद्र, वृद्धाश्रम भेट, आरोग्य तपासणी शिबिरे.
  • शाळा आणि स्थानिक संस्थांच्या सहयोगाने व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, महिला सुरक्षा इ. विषयांवर जनजागृती.
  • विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांसोबत संयुक्त उपक्रम.

कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम

आमची संस्था विद्यार्थ्यांच्या सामाजिक भान वाढवणाऱ्या, नैतिक मूल्ये रुजवणाऱ्या आणि व्यावहारिक शिक्षणावर भर देणाऱ्या उपक्रमांत सातत्याने सक्रीय असते. पुढील उपक्रम संस्थेमार्फत नियमित राबवले जातात:

सामाजिक आणि नागरिक जबाबदारी

  • ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शालेय स्तरावर विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती: मतदान, प्लास्टिक प्रतिबंध, पर्यावरण संरक्षण.
  • रस्ते सुरक्षा, अपघात प्रतिबंधक उपाय, वाहतूक नियमांबाबत जनजागृती.
  • आरोग्य जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन.

आरोग्य, स्वच्छता व आरोग्यप्रशिक्षण

  • विद्यार्थ्यांना पोषण आहार, योग, स्वच्छतेचे महत्त्व याबाबत माहिती देणे.
  • आरोग्य विषयक व्याख्याने, स्वच्छता अभियान, मुलांना शारीरिक व मानसिक आरोग्य प्रशिक्षण.
  • हिवताप, डेंग्यू, कुपोषण, एचआयव्ही/एड्स इ. बाबत जागरुकता निर्माण करणे.

कला, संस्कृती व पर्यावरणस्नेही उपक्रम

  • विद्यार्थ्यांना शालेय बागकाम, रोपवाटिका, वनसंवर्धन यांमध्ये सहभागी करून घेणे.
  • पाण्याचे संवर्धन, जलदूत अभियान, पाणी आडवा–पाणी जिरवा यासारख्या उपक्रमांत सहभाग.
  • सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, पारंपरिक सण व उत्सव साजरे करून संस्कृतीचे संवर्धन.

विद्यार्थीविकास व क्षमता निर्माण

  • वक्तृत्व, विज्ञान प्रदर्शन, हस्तकला स्पर्धा, एकांकिका इत्यादींत विद्यार्थ्यांना संधी.
  • विविध सरकारी योजनांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ घेण्यास प्रोत्साहन.
  • उद्योजकता विकास प्रशिक्षण आणि मुलाखत तंत्र, रोजगार मार्गदर्शन.
सामाजिक उपक्रम
सामाजिक उपक्रम