लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ गेल्या दहा वर्षांपासून शाळांना शैक्षणिक नियोजन आणि मूल्यमापनासाठी मार्गदर्शन करत आहे. आमच्या शैक्षणिक उपक्रमांचा भाग व्हा.

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार

२५ जून २०२५ वेळ: दुपारी २:०० यशदा सभागृह, पुणे

मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश जालिंदर देशमुख यांना पुणे येथील ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनच्यावतीने पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे : ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनच्या वतीने यशदा सभागृहात सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश जालिंदर देशमुख यांना शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी पुरस्कार प्रदान करताना पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांनी देशमुख यांच्या शिक्षणक्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, सचिव प्रा. मयंक शर्मा उपस्थित होते.