लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ गेल्या दहा वर्षांपासून शाळांना शैक्षणिक नियोजन आणि मूल्यमापनासाठी मार्गदर्शन करत आहे. आमच्या शैक्षणिक उपक्रमांचा भाग व्हा.

जि.प. शाळांची गुणवत्ता वाढवा

जि.प. शाळांची गुणवत्ता वाढवा

२८ जून २०२५ वेळ: सकाळी १०:०० लातूर, महाराष्ट्र

जिल्ह्यातील खासगी शाळांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

लातूर : जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी खासगी शाळांच्या मदतीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्ह्यातील खासगी शाळांनी जिल्हा परिषद शाळांना मार्गदर्शन देऊन त्यांची गुणवत्ता वाढविण्यास मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्ह्यातील खासगी शाळांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद शिक्षक संघाचे नेते, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शाळांमधील मूलभूत सुविधा, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पातळीत सुधारणा या विषयांवर चर्चा झाली. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एकसमान गुणवत्ता असावी यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.