लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ गेल्या दहा वर्षांपासून शाळांना शैक्षणिक नियोजन आणि मूल्यमापनासाठी मार्गदर्शन करत आहे. आमच्या शैक्षणिक उपक्रमांचा भाग व्हा.

अंशतः शाळा टप्पा वाढ निधीसाठी बंद

अंशतः शाळा टप्पा वाढ निधीसाठी बंद

८-९ जुलै २०२५ वेळ: संपूर्ण दिवस महाराष्ट्र राज्य

शिक्षक समन्वय संघाने दिला शासनाला इशारा

लातूर, ता. ५ : अंशतः शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणीमध्ये आर्थिक तरतूद न केल्याने (ता. आठ व नऊ जुलै) रोजी राज्यातील शाळा बंद करण्याचा इशारा शिक्षक समन्वय संघाने दिला आहे. या बंद आंदोलनाला अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने पाठिंबा देत या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षक समन्वय संघामार्फत पाच जूनपासून मुंबईत अंशतः अनुदानित शाळांचे आंदोलन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळांच्या निधीसाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही शासनाने दिली होती. पण, तरतूद झाली नसल्याने राज्यभर अंशतः अनुदानित शिक्षकांत असंतोष पसरला आहे. तसेच, शासनाने वेळोवेळी आश्वासने देऊनही या शिक्षकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद करण्याचा इशारा या संघाने दिला आहे. या आंदोलनास अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी केले आहे.